घटक पक्ष अस्वस्थ : भाऊबंदकी सोडण्याचा आग्रह
मुंबई : शिवसेना-भाजपाच्या मानापमान नाटय़ावर पडदा पडत नसल्यामुळे महायुतीचे जागावाटप लांबणीवर पडले असून, घटक पक्षांची अस्वस्थता वाढत चालली आहे. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबई भेटीवर आले असून त्यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक झाली. महायुतीत कुठलाही पक्ष मोठा भाऊ आणि लहान भाऊ नाही; सर्व पक्ष समान आहेत. सरकार आल्यास सर्वाना समान अधिकार राहील, हे शिवसेनेच्या गळी उतरवा, असे शहा यांनी भाजपा नेत्यांना सांगितल्याचे समजते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आज दिवसभरात दोन वेळा मातोश्रीवर पायधूळ झाडून आपल्या वाटय़ाच्या जागा मिळाव्यात याकरिता प्रयत्न केले, तर दुसरीकडे रामदास आठवले हेही अपेक्षित जागा न मिळाल्याने नाराज आहेत. भाजपासोबतच्या वाटाघाटी पूर्णत्वाला जात नाहीत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांचे
18 जागांमध्ये समाधान होत नाही़ त्यामुळे महायुतीच्या भवितव्याचा निर्णय
आता रविवार्पयत पुढे ढकलला
आहे. (विशेष प्रतिनिधी)
अदलाबदल कळीचा मुद्दा
च्सेनेच्या प्रस्तावानुसार भाजपाला त्यांनी 12क् जागा देऊ केल्या आहेत, तर शिवसेना स्वत: 15क् जागा लढणार आहे. याखेरीज मित्रपक्षांना 18 जागा देऊ केल्या आहेत. भाजपाला 12क् जागांचा प्रस्ताव मान्य नाही. त्यांना अतिरिक्त जागा हव्या आहेत.
च्काही जागांची अदलाबदल करताना शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांकडे मातब्बर इच्छुक असल्याने तोही कळीचा मुद्दा ठरला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतून येणा:या काही नेत्यांना भाजपाचा पर्याय मान्य आहे. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या व शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे.
च्रिपाइं, स्वाभिमानीला दोनअंकी जागा हव्या आहेत. जानकर यांचे दोन-तीन जागांवर समाधान व्हायला तयार नाही. विनायक मेटेही गप्प बसण्यास तयार नाहीत. त्यामुळे जागांचा हा वाद आणखी दोन-तीन दिवस मिटण्याची शक्यता नाही.
समजूतदार भूमिका घ्या : महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समजूतदार भूमिका घेणो गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
बैठक लांबणीवर : सेनेने नेते, उपनेते, संपर्क नेते, आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी दुपारी 12 वाजता बोलावली होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करून आता रविवारी बोलावली आहे.
भाजपा नेत्यांनी आठवलेंना ताटकळत ठेवले!
भाजपा नेत्यांची भेट घेण्यास रंगशारदा येथे गेलेल्या रामदास आठवलेंना दीड-दोन तास बसवून ठेवल्यावरही भाजपा नेत्यांची भेट न मिळाल्याने ते संतापले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र आपण महायुतीसोबत राहणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.