पत्नीवर हल्ला करून प्राध्यापक पतीचा आत्महत्येचा प्रयत्न ! कौटुंबिक कलहातून घडली घटना
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
मूर्तिजापूर (जि. अकोला): कौटुंबिक कलहातून प्राध्यापक पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील प्रतीक नगर (हातगाव) परिसरात २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, पत्नीवर खासगी तर पतीवर सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत.
पत्नीवर हल्ला करून प्राध्यापक पतीचा आत्महत्येचा प्रयत्न ! कौटुंबिक कलहातून घडली घटना
मूर्तिजापूर (जि. अकोला): कौटुंबिक कलहातून प्राध्यापक पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील प्रतीक नगर (हातगाव) परिसरात २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, पत्नीवर खासगी तर पतीवर सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत. कारंजा-अकोला रोडवरील प्रतीक नगर येथे राहणारे आणि तालुक्यातील घोटा येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश सहदेव वासनिक (५५) यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास पत्नी निर्मलावर (५२) घरगुती कलहातून धारदार चाकूने वार केले. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली व दोघांनाही उपचारासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दोघांचीही प्रकृ ती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. प्रकाश वासनिक यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात तर निर्मला वासनिक यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.प्रकाश वासनिक हे गेल्या आठवड्यापासून घरगुती कलहामुळे त्रस्त होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा शुभम (२२) हा नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी अमरावतीला शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक गणेश कोथळकर आदी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।