शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये चौथ्या कोरोना प्रतिबंधक लसीचेही उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:10 IST

, झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोविड शिल्ड (आॅक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : हैदराबादमधील आणखी एक कंपनी बायोलॉजिकल ई (बीई) ही देखील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणार असून त्यामुळे भारतात कोव्हॅक्सिन (उत्पादक : भारत बायोटेक-आयसीएमआर), झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोविड शिल्ड (आॅक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार हे आता स्पष्ट झाले आहे.इंडियन व्हॅक्सिन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लस तयार करण्यासाठी आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीशी करार केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने निधी पुरवावा या मागणीसाठी इंडियन व्हॅक्सिन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या सदस्यांची भेट घेतली. केंद्रीय जैवतंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारीत हे कौन्सिल येते.>भारताला ६० ते ७० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस लागतील असा अंदाज लस या विषयावरील कृती गटाचे प्रमुख व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी नुकताच व्यक्त केला होता. मात्र कोरोना प्रतिबंधक लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच नेमके किती डोस विकत घेणार हे भारत जाहीर करेल असे पॉल म्हणाले होते.>भारताने कोणाकडूनही लसखरेदीसाठी अद्याप करार केलेले नाहीत. मात्र असे करार काही कंपन्यांशी अमेरिका, इंग्लंड, युरोपीय समुदायातील देश, स्वित्झर्लंड, जपान यांनी केले आहेत.ते जागतिक स्तरावरील औषध कंपन्यांना या लसीपोटी ५ अब्ज डॉलर देणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या