शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न जगाला कळले, सरकारचे दुर्लक्ष; केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:04 IST

राहुल गांधी यांची टीका, केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

वायनाड : भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या व्यथा संपूर्ण जगाच्या लक्षात आल्या आहेत. सारे जग शेतकरी आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत आहे. पण, केंद्रातील मोदी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केली. 

काँग्रेसतर्फे केरळमध्ये काढण्यात आलेल्या सहा किलोमीटरच्या ट्रॅक्टर रॅलीत राहुल गांधी सहभागी झाले  होते. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, भारतात शेती हा सर्वांत मोठा म्हणजे तब्बल ४० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.  शेतकऱ्यांच्या जिवावरच हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. पण, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. हा सारा व्यवसाय आपल्या दोन मित्रांच्या हाती सोपविण्यासाठीच तिन्ही कृषी कायदे करण्यात आले आहेत. 

हे काळे कायदे रद्द व्हावेत, यासाठी जनतेने मोदी सरकारवर दबाव आणायला हवा, असे आवाहन करून राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जगाला समजल्या, कलाकारांना लक्षात आल्या. पण, सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांचे नव्हे, तर आपल्या काही मित्रांचेच भले करण्याची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)

शेतकरी जगायलाच हवा

मोदी सरकार सतत भारतमातेच्या नावाचा जयघोष करते. तो सर्वांनीच करायला हवा. पण, या भारतमातेसाठी शेती हाच एकमेव सर्वांत मोठा व्यवसाय असून, तो टिकायला हवा, शेतकरी जगायला हवा. पण पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे सारे निर्णय मात्र शेती व शेतकरी यांच्या विरोधातील आहेत. - राहुल गांधी

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी