शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:14 IST

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत.बसेस नॉयडा, गाझियाबादला पाठविता येतील.उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. राजकारण खेळण्यासाठी जाणूनबुजून वाहनांचे नंबर खोटे असल्याचे भासविण्यात आले. आम्ही बससेचे नंबर सार्वजनिक करू शकतो, सरकारने हवी तर शहानिशा करावी, असेही ते म्हणाले.काँग्रेस आणि राज्य सरकारदरम्यान सोमवारी रात्री २.१० वाजेपर्यंत पत्रव्यवहार सुरू होता. त्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे. अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेली सर्व पत्रे काँग्रेस सोशल मीडियावरून सार्वजनिक करीत आहेत. बसेस सध्या उंचा नगला, आग्रा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत.आरोप-प्रत्यारोपस्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यावरून राज्य सरकार आणि काँग्रेसदरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या मुद्यावरून काँग्रेस राजकारण करीत आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला.ते म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या बसेसच्या यादीबाबत शहानिशा केली असता त्यात दुचाकी वाहने, आॅटो, मालवाहक गाड्यांचा समावेश असल्याचे कळले. ही बाब दुर्दैवी आहे. अशी फसवणूक कशासाठी? याचे काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिले पाहिजे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ