प्रियंका गांधी प्रथमच लोकसभा लढविणार, रायबरेलीतून मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:37 AM2024-02-16T09:37:58+5:302024-02-16T09:38:28+5:30

प्रथमच उतरणार निवडणुकीच्या रणांगणात

Priyanka Gandhi will contest the Lok Sabha for the first time, from Rae Bareli | प्रियंका गांधी प्रथमच लोकसभा लढविणार, रायबरेलीतून मैदानात

प्रियंका गांधी प्रथमच लोकसभा लढविणार, रायबरेलीतून मैदानात

आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर रायबरेलीतून कोण याबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. प्रियंका गांधी रायबरेलीतून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक रणनीतीकारांनी प्रियंका यांना रायबरेलीऐवजी अमेठीतून उभे राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र प्रियंंका आपल्या आईच्या जागेवरून निवडणूक राजकारणाची सुरुवात करतील, असे संकेत मिळत आहेत. 

तुमच्याविना माझे कुटुंब 
अपूर्ण : सोनियांची साद“आरोग्य आणि वयाच्या समस्यांमुळे आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत,” असे भावनिक पत्र काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांना लिहिले.                              

Web Title: Priyanka Gandhi will contest the Lok Sabha for the first time, from Rae Bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.