शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis च्या इंजेक्शनच्या कमतरतेवरून प्रियंका गांधींची पंतप्रधानांकडे मागणी; म्हणाल्या, "या दिशेने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:12 IST

Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी साधला पतप्रधानांवर निशाणा. सध्या देशात ब्लॅक फंगसच्या आजाराचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

ठळक मुद्देप्रियंका गांधींनी साधला पतप्रधानांवर निशाणा. सध्या देशात ब्लॅक फंगसच्या आजाराचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणू संदर्भातील प्रकरणांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. ऑक्सिजनचं प्रकरण असेल किंवा लसींची कमतरता प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. सध्या देशातील परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. असं असलं तरी आता ब्लॅक फंगस (Mucormycosis) हा आजार जोकं वर काढून लागला आहे. यासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स सहजरित्या उपलब्ध होणं आणि आयुष्यमान योजनेअंतर्गत त्याचा समावेश करण्याची मागणी प्रियंका गांधी यांनी मोदींकडे केली आहे."म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis, ब्लॅक फंगस) इजेक्शनची मागणी वाढत आहे. या संकटात प्रत्येक वेळी आपल्याला औषधांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. जबाबदार कोण आहे? इंजेक्शन महागडं आहे, आयुष्यमान योजनेत कव्हर होत नाही. मोदीजी, कृपया या दिशेनं त्वरित पावलं उचला," असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे. यासोबबतच त्यांनी एक आवश्यक अपील असं म्हणत मागण्याही जोडल्या आहेत.

लसीकरण मोहिमेवरूनही साधला होता निशाणाप्रियंका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. कोरोना विरोधी लसीकरणासाठीचा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला गेला? असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी वारंवार कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारला रोखठोक प्रश्न विचारत आहेत. "मे महिन्यात लस उत्पादन क्षमता ८.५ कोटी. एकूण उत्पादन झालं ७.९४ कोटी आणि लस देण्यात आल्या ६.१ कोटी, सरकारचा दावा आहे की जूनमध्ये १२ कोटी डोस येणार आहेत. पण कुठून? लस उत्पादन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत ४० टक्क्यांची वाढ झालीय का? लसीकरणाचं ३५ हजार कोटींचं बजेट नेमकं कुठे खर्च झालं? अंधेर वैक्सीन नीति, चौपट राजा", असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं होतं. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरmedicineऔषधं