शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

"मॅडम एक और... तुम भी खाओगे", प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 16:16 IST

प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला.

म्हैसूर : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, ब्रेक दरम्यान त्या डोसा बनवतानाही दिसल्या. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या म्हैसूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये डोसा बनवताना दिसत आहेत.

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी कर्नाटक राज्यातील त्यांच्या व्यस्त निवडणूक प्रचारातून ब्रेक घेतला. त्यानंतर त्या म्हैसूरच्या सर्वात प्रसिद्ध मैलारी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी पोहोचल्या. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतर काही जण होते. म्हैसूरच्या सर्वात जुन्या हॉटेल मैलारीमध्ये इडली आणि डोसे खाल्ल्यानंतर प्रियांका गांधी यांनी डोसे बनवण्याची कला शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ही इच्छाही पूर्ण झाली.

प्रियांका गांधी यांची इच्छा ऐकून रेस्टॉरंटच्या मालकाला खूप आनंद झाला आणि त्याने लगेच होकार दिला. तो त्यांना आपल्यासोबत किचनमध्ये घेऊन गेला. तिथे प्रियांका गांधी यांनी स्वतः डोसा बनवला. त्याठिकाणी उपस्थित असलेले लोक प्रियांका गांधींना म्हणाले "मॅडम, एक और बनाइए". त्याच्या उत्तरात प्रियंका गांधी हसल्या आणि म्हणाल्या- "तुम भी खाओगे". दरम्यान, प्रियांका गांधी यांनी तव्यावर जवळपास 6 डोसे तयार केले. परंतु ते वेळीच पलटवू न शकल्याने त्यातील किमान दोन भाजले. या घटनेने हशा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलांशी संवादही साधला. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला.

मंगळवारी म्हैसूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, "पंतप्रधान इथे आले आणि म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेता त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधानांचे चांगले आरोग्य हवे आहे.'' तसेच, त्या म्हणाल्या, "कर्नाटकच्या जनतेने त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून नाही," त्या म्हणाल्या, भाजपने राज्यात कोणतेही विकास काम केले नसल्याने कर्नाटकात परिवर्तनाची वेळ आली आहे. दरम्यान, कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात 10 मे रोजी होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक