शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधी युपीतून लोकसभा लढवणार; अमेठी  आणि रायबरेलीत काँग्रेस नेते सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:10 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे...

राजेंद्र कुमार -लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातून (युपी) लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सध्या त्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना तयार करण्यात व्यग्र असल्या तरी त्यासोबतच त्यांनी युपीतून लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे नेते हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गावोगावी जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. या दोनपैकी एका जागेवर प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाणार आहे.

सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते ही चर्चा फेटाळतात. 

काय आहे गणित?त्यांचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणुकीत येथील मतदार अन्य पक्षांकडे वळले तरी लोकसभा निवडणुकीत ते पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी असतात. अशा स्थितीत रायबरेलीतून फक्त सोनिया गांधीच निवडणूक लढवतील, असे पक्षाचे नेते गृहीत धरत आहेत. तरीही अपरिहार्य परिस्थितीत सोनिया गांधींनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर प्रियांका गांधी येथून उमेदवार असतील. 

तसेच मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यास प्रियांका अमेठीतून निवडणूक लढवू शकतात. या दोन जागांशिवाय पक्षाचे नेते प्रियांकासाठी प्रयागराज व फुलपूर लोकसभा मतदारसंघाचाही पर्याय तपासत आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी