शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 11:27 IST

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती. 

उत्तर प्रदेश प्रभारी पदावरून मुक्त केल्यानंतर, आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पदयात्रेमध्ये दिसू शकतात. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे काढण्यात येणाऱ्या या यात्रेत राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही रस्त्यावर दिसू शकतात. टीओआय ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मोठा प्रस्ताव असा आहे की राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या योत्रेत सोबत चालावे. या संदर्भात रणनीती आखणाऱ्या मंडळींनी यासंदर्भात विचारही केला आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती. 

यासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने म्हटले आहे की, या संपूर्ण यात्रेदरम्यान या भाऊ-बहिणीने एकत्रीतपणे सहभागी होण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राहुल गांधी तर नेते आहेतच. मात्र प्रियांका गांधी यांची महिला, तरुण वर्ग आणि ग्रामीण भागांतील लोकांमध्ये चांगली क्रेझ आहे, असे काँग्रेसचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, दक्षिणेकडून उत्तरेकडे काढण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील पदयात्रेतही, काही ठिकाणी प्रियांका गांधी राहुल गांधींसोबत दिसून आल्या होत्या. 

यावेळची यात्रा हायब्रिड मोडमध्ये असेल - नुकतेच काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल गांधी यांना यात्रा 2.0 काढावी असे म्हटले होते. मात्र, लोकसभा निवडणुका लक्षात घेत पुन्हा एकदा 4-5 महिने रस्त्यावर घालवीणे काचित योग्य ठरणार नाही, असेही पक्षाला वाटते. यामुळे काँग्रेस या यात्रेला हायब्रीड यात्रेचे स्वरूपही देऊ शकते. ही यात्रा काही शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये पाई चालेल. तर उर्वरित यात्रा वाहनांतून पूर्ण केली जाईल.

सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी असल्यास, माजी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक कार्यक्रमांसाठी सहजपणे वेळ काढता येईल, हा सर्वात मोठा फायदा असेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राlok sabhaलोकसभा