शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "मोदीजी हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:50 IST

Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली असून आता यात नोंदवलेल्या आरोपांची माहिती समोर आली आहे. 2 एफआयआरमध्ये बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची मागणी आणि विनयभंगाच्या 10 तक्रारी आहेत. एफआयआरमध्ये अशा 10 प्रकरणांचा उल्लेख आहे, यामध्ये विनयभंगाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एफआयआरनुसार, यामध्ये चुकीचा स्पर्श करणं, कोणत्याही बहाण्याने पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करणं, असं म्हटलं आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वृत्तपत्राचा रिपोर्ट शेअर करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग केलं. "नरेंद्र मोदीजी, हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?'' असं म्हणत प्रियांका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका यांनी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये बृजभूषण यांच्याविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक छळाच्या एक किंवा दोन नव्हे तर 10 प्रकरणांचा उल्लेख आहे. 

21 एप्रिल रोजी ही तक्रार कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी दोन एफआयआर नोंदवले. या दोन्ही एफआयआर आयपीसी कलम 354, 354A (लैंगिक छळ), 354D  आणि 34 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. यात एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा प्रौढ कुस्तीपटूंवरील आरोपांचा समावेश आहे आणि WFI सचिव विनोद तोमर यांचे नाव देखील आहे.

दुसरी एफआयआर एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या आधारावर आहे. यात त्यांनी POCSO कायद्याच्या कलम 10 देखील लागू आहे, ज्यामध्ये पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आहे. 2012 ते 2022 या कालावधीत भारतात आणि परदेशात कथितपणे उल्लेख केलेल्या घटना घडल्या. अल्पवयीन मुलीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीने तिला पकडले, फोटोसाठी पोज देण्याचा बहाणा केला, जाणून बुजून चुकीच्या पद्धतीन स्पर्श केला, असं यात म्हटलं आहे.

6 महिला कुस्तीपटूंपैकी पहिल्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवताना आरोपीने मला त्याच्या टेबलावर बोलावले आणि मला स्पर्श केला. कुस्ती महासंघाच्या कार्यालयात माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श केला. दुसऱ्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, मी मॅटवर झोपले असताना आरोपी माझ्याकडे आला, माझा प्रशिक्षक तिथे नव्हता, तेव्हा माझ्या परवानगीशिवाय माझा टी-शर्ट ओढला, असं या तक्रारीत म्हटले आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीWrestlingकुस्ती