शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पंक्चर केले, प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 09:46 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यापासून अर्थजगतात चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही घटलेल्या जीडीपीवरून मोदी सरकारला टोला लगावला'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यापासून अर्थजगतात चिंतेचे वातावरण असून, घटलेल्या जीडीपीवरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही घटलेल्या जीडीपीवरून मोदी सरकारला टोला लगावला आहे. 'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात की, अच्छे दिनचा भोंगा वाजवणाऱ्या भाजपा सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले आहे हे. घटलेल्या आर्थिक विकासदरावरून स्पष्ट होते. ना जीडीपी वाढत आहे, ना रुपया मजबूत होत आहे. रोजगारही मोठ्या प्रमाणावर घटत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या झालेल्या बट्ट्याबोळासाठी कोण जबाबदार आहे, हे आतातरी स्पष्ट करा.''  आधीच मंदीच्या माऱ्याने रुतण्याच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती आणखी मंदावली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मंदी, कृषी क्षेत्रात झालेली घट, यामुळे भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या नीचांकापर्यंत खाली उतरला असून, तो ५ टक्के झाला आहे.यापूर्वी २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४.९ टक्के एवढा कमी वृद्धिदर नोंदविला गेला होता. २०१८-१९ मध्ये याच तिमाहीत तो ८ टक्के एवढ्या उच्च स्तरावर गेला होता. यावर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो ५.८ टक्के होता. २०१९-२० मध्ये जीडीपीचा वृद्धीदर ७ टक्क्यांऐवजी ६.९ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील जून महिन्यात व्यक्त केला होता, तसेच एकूण मागणी वाढवून विकासाबाबतची चिंता दूर करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला होता. रिझर्व्ह बँकेने पहिल्या सहामाहीत जीडीपी वृद्धीदर ५.८ ते ६.६ टक्क्यांच्या दरम्यान व दुसºया सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६.२ टक्के होता. मागील २७ वर्षांतील तो सर्वांत कमी राहिला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था