नवी दिल्ली - प्रियंका गांधीकाँग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद स्वीकारून राजकारणात औपचारिकरीत्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या आज लखनौ येथे होणाऱ्या रोड शोकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. दरम्यान, लखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी अस्र असलेल्या ट्विटरवही आगमन झाले आहे. प्रियंका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आजपासून सुरू झाले असून, त्यांचे ट्विटवर आगमन होताच त्यांना फॉलो करण्यासाठी फॉलोअर्सची झुंबड उडाली आहे. प्रियंका गांधी वाड्रा या नावाने प्रियंका गांधी यांचे ट्विटरवरी अधिकृत अकाऊंट सुरू झाले आहे. त्यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी अद्याप कुठलेली ट्विट केलेले नाही. मात्र त्या काँग्रेस, राहुल गांधी, अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, अशोक गहलोत, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना फॉलो करत आहेत.
प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:45 IST
लखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी अस्र असलेल्या ट्विटरवही आगमन झाले आहे.
प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद
ठळक मुद्देलखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी अस्र असलेल्या ट्विटरवही आगमन झाले आहे.प्रियंका गांधी वाड्रा या नावाने प्रियंका गांधी यांचे ट्विटरवरी अधिकृत अकाऊंट सुरू झाले आहे. प्रियंका गांधी यांचे ट्विटवर आगमन होताच त्यांना फॉलो करण्यासाठी फॉलोअर्सची झुंबड उडाली आहे.