शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:31 IST

प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.

लखनौ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पुन्हा सुरू झाली. यावेळी त्यांच्यासोबत  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी राज्यातील यात्रेच्या अंतिम टप्प्यात सामील झाल्या. या यात्रेत पहिल्यांदाच गांधी भाऊ बहीण एकत्र दिसले. ही यात्रा अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलीगढ, हाथरस, आग्रा यामार्गे जात राजस्थानच्या धोलपूर येथे रविवारी मुक्काम करेल. यात्रा मुरादाबादच्या विविध भागांतून जात असताना लोकांनी ‘राहुल गांधी जिंदाबाद’, ‘प्रियंका गांधी जिंदाबाद’ आणि ‘काँग्रेस पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. 

दोन्ही काँग्रेस नेते उघड्या जीपमधून लोकांना अभिवादन करत होते. प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रविवारी आग्रा येथून यात्रेत सामील होणार आहेत. लोकसभेसाठी दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशात जागावाटप अंतिम केल्यांनतर अखिलेश यात्रेत येत आहे. काँग्रेसने स्पष्ट केले की, २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान यात्रेला विश्राम असेल, जेणेकरून राहुल यांना २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात दोन विशेष व्याख्याने देता येतील. या काळात ते नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांनाही हजेरी लावणार आहेत. ही यात्रा २ मार्च रोजी दुपारी २ वाजता राजस्थान येथील धोलपूरमधून पुन्हा सुरू होईल. 

राहुल गांधी यांची याचिका फेटाळलीरांची : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणी प्रकरणातील तक्रार रद्द करण्यासाठी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी शाह यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी भाजप नेते नवीन झा यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी याचिकाकर्ते व राहुल गांधी यांना ४ फेब्रुवारीला न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले. कनिष्ठ न्यायालयाने आपली भूमिका ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, यासाठी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस