शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...तर सरळ घरी चालते व्हा; धक्काबुक्की झाल्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 10:03 IST

प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दी सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली.

नवी दिल्ली:  कठुआ-उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ गुरूवारी मध्यरात्री काँग्रेस पक्षाकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया गेटपर्यंत मेणबत्ती मोर्चा (कँडल मार्च) काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल यांची बहीण प्रियांका गांधी यादेखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी गर्दीतील लोकांच्या हुल्लडबाजीमुळे प्रियांका यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी या लोकांना, 'गोंधळ घालायचा असले तर सरळ घरी चालते व्हा', अशा शब्दांत सुनावले. मेणबत्ती मोर्चा इंडिया गेटजवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. अनेकजण प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दी सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली. त्यामुळे प्रियांका यांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. या सगळ्यामुळे प्रियांका गांधी यांची लहान मुलगी खूप गांगरली आणि रडायला लागली. तेव्हा प्रियांका गांधी प्रचंड संतापल्या. त्यांनी धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्ही याठिकाणी कशासाठी आले आहात, याचे जरा भान बाळगा. आता प्रत्येकाने गप्प बसा. ज्यांना धक्काबुक्की करायचेय त्यांनी सरळ घरी चालते व्हा, असे प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.सुरूवातीला कार्यकर्त्यांची गर्दी पाहून राहुल गांधींचा मेणबत्ती मोर्चा यशस्वी झाला, असे वाटल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंद पसरला.  मात्र थोड्याच वेळात या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण कार्यकर्ते आणि उपस्थित लोकांनी अत्यंत बेशिस्तपणे गर्दी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. आंदोलन सोडून लोक राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागले. मोर्चा बाजूला राहिला आणि कार्यकर्त्यांना आवरताना राहुल गांधींच्या नाकीनऊ आले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीRahul Gandhiराहुल गांधीDelhi Gateदिल्ली गेट