शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 21:31 IST

प्रियंका गांधींचा रोजगार, अग्निवीर, शेतकरी कल्याण योजनांरुन राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा

Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका वाड्रा-गांधी यांनी बुधवारी(2 ऑक्टोबर) हरियाणामध्ये पक्षाचा प्रचार केला. यावेळी त्यांनी 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले. प्रियंका त्यांच्या पक्षाच्या उमेदवार आणि ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या प्रचारासाठी जुलाना येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी रोजगार, अग्निवीर, शेतकरी कल्याण या मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक स्तरावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रियांका गांधींचा भाजपवर निशाणा प्रियांका गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, कुरुक्षेत्राची लढाई आणि ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या लढाईसारखी संधी पुन्हा आली आहे. आजचा लढा अन्याय, असत्य आणि वाईटाच्या विरोधात आहे. तुम्हाला हा लढा लढावाच लागेल. हे सरकार मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. केंद्र सरकार रोजगार निर्मिती करू शकत नाही, कारण या सरकारने अंबानी-अदानींना सर्व काही दिले आहे.

प्रियांका पुढे म्हणतात, सर्व बंदरे, विमानतळ, जमिनी बड्या उद्योगपतींना दिल्या. शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकत नाहीत. अग्निपथ योजनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, अग्निवीर जवानांना चार वर्षांच्या सेवेनंतर पुन्हा नोकरी शोधावी लागेल आणि त्यांना पेन्शनही मिळणार नाही. मोदीजींनी तुम्हाला हेच दिले आहे. 10 वर्षे तुमची दिशाभूल करण्यात आली. शेतकरी, सैनिक, पैलवान, महिला या सर्वांवर 10 वर्षांपासून अन्याय होत आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मोदींनी 5 मिनिटेही येण्याची तसदी घेतली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीVinesh Phogatविनेश फोगटHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024