शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी 'या' मतदार संघातून निवडणूक लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 16:39 IST

राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.  

ठळक मुद्देप्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे.अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार?

नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या बुधवारी प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकांत रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी काढलेले हे प्रियंका गांधी नावाचे ब्रह्मास्त्र असल्याचे मानले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, त्या काँग्रेसच्या कोणत्या कार्यालयातून पार्टीचे कामकाज पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या चार फेब्रुवारीला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी लखनऊमधील पार्टी मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पार्टी मुख्यालयात तयारी सुरु आहे. 

असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, पूर्व उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे, असे सांगण्यात येते की, राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  

याचबरोबर, अशी चर्चा आहे की, प्रियंका गांधी या इलाहाबाद येथील जवाहरलाल भवनमधील कार्यालयात असतील. एकेकाळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कार्यालयात बसून पार्टीचे काम पाहात होत्या. याशिवाय, लखनऊमध्ये पार्टीचे नवीन मुख्यालय तयार करण्यात आले आहे. याठिकाणी सुद्धा प्रियंका गांधी यांच्या कार्यालयासाठी जागा आहे. त्यामुळे लखनऊ येथून प्रियंका गांधी पार्टीसाठी काम करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी