शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

प्रियंका मैदानात?

By admin | Updated: May 28, 2016 04:52 IST

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसतर्फे जूनच्या मध्यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेबरोबरच तिथे काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसतर्फे जूनच्या मध्यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेबरोबरच तिथे काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल. प्रियंका गांधींच्या आगमनाची ही घोषणा असेल काय? याचा खुलासा करण्याचे पक्षाच्या सूत्रांनी सावधपणे टाळले असले तरी मंगळवारी पक्षाचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अलाहाबाद येथील बैठकीत, प्रियंका गांधींकडेच उत्तर प्रदेशच्या प्रचाराची सारी सूत्रे सोपवण्यात यावीत, या मागणीचा नेत्यांनी जोरदार पुरस्कार केल्याचे समजते.प्रशांत किशोर यांनी आसाममध्ये ज्या दोन प्रादेशिक पक्षांशी समझोता करण्याचा सल्ला काँग्रेसला दिला होता. त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. त्याच दोन पक्षांशी आघाडी करून भाजपाने आसाम जिंकले. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोरांच्या सल्ल्याचे महत्त्व काँग्रेसमध्ये वाढले आहे.

- आसाम व केरळची सत्ता काँग्रेसने गमावल्यानंतर प्रियंका यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.प्रशांत किशोर उत्तर प्रदेशात अ‍ॅक्टिव्ह ...पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग व प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाले अशा बातम्या मध्यंतरी पसरल्या. त्यानंतर किशोर यांनी निवडणुकीची रणनीती ठरवावी. पक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा सूर काही नेत्यांनी लावला. पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते शकील अहमद यांनीही त्याला दुजोरा दिला होता. आसामच्या निकालानंतर काँग्रेसमधील किशोरविरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पीकेंच्या सल्ल्यानुसारच पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी अमरिंदरसिंग यांच्या नावाची घोषणा होणार आहे. संघटनेतील बदलांबाबत प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी ते जूनपासून २0 दिवस उत्तर प्रदेशात तर १0 दिवस पंजाबमधे तळ ठोकणार आहेत. त्यांच्या पथकाचे १00 सदस्य सध्या राज्यात ठिकठिकाणी फिरून विविध प्रकारची सविस्तर माहिती गोळा करीत आहेत. उत्तर प्रदेशात आजवर ६0 जिल्ह्यांतील काँग्रेस नेत्यांची किशोर यांनी भेट घेतली. त्यांनी २0१७च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे नव्या टीमची मागणी केली आहे. ‘बेशिस्त कार्यक र्त्यांच्या भरवशावर पक्ष विजयी होऊ शकत नाही. निवडणुकीत ज्यांना तिकीट हवे असेल, त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रभावशाली समर्थकांची यादी व त्यांचे वर्णन सादर करावे, तसेच भाजपा, सप व बसपच्या संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत काँग्रेसमध्ये मतदारसंघात कोणती कमतरता आहे, याचे तपशीलही लेखी स्वरूपात सादर करावेत,’ असा सूचक सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे.