शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी कारवाईची नोटीस, लोकसभा अध्यक्षांकडे पाठविली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:42 IST

राज्यसभा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे.

नवी दिल्ली- राज्यसभा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे शनिवारी पाठवली आहे. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य असल्याने हे प्रकरण लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठविण्यात आलं आहे. 

भाजपाचे राज्यसभेचे खासदर भुपेंद्र यादव यांनी सभागृहात राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकरांचं उल्लंघन प्रकरणी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता.  'राहुल गांधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत. राहुल गांधी यांनी जेटलींच्या आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल करुन ते Jaitley ऐवजी Jaitlie असं लिहीले आहे. यातून जेटलींचा अपमान झाला. असं राहुल गांधींवर आरोप करताना भुपेंद्र यादव यांनी म्हंटलं. 

दरम्यान, भुपेंद्र यादव यांच्या प्रस्वावाची तपासणी करण्यात आली आहे. तसंच ही बाब आमच्या अधिकार क्षेत्रात नसल्यामुळे ते लोकसभा सभापतींकडे पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावर येथेच कारवाई केली जाऊ शकते, असं व्यंकय्या नायडू यांनी म्हंटलं.राहुल गांधी यांनी २७ डिसेंबर रोजी राज्यसभेचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर ट्विट करून टीका केली होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूSumitra Mahajanसुमित्रा महाजन