शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक साह्य देण्यास प्राधान्य- केंद्रीय मंत्री नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:26 IST

केंद्रीय मंत्र्यांची विजय दर्डा यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक साह्य देण्यास माझे प्राधान्य असेल, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी येथे सोमवारी झालेल्या भेटीत राणे म्हणाले की, छोट्या व्यापाऱ्यांना कोविड-१९ च्या दिवसांत मोठा तोटा सहन करावा लागला आणि त्यांना आवश्यक ते आर्थिक साह्य देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे मंत्रालय प्राधान्य देईल. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मी काम करीत असून या उद्देशासाठी आवश्यक ती तरतूद अर्थसंकल्पात करावी यासाठी सरकारकडे बाजू माडंली आहे, असेही नारायण राणे म्हणाले. आमच्या खात्याच्या जीडीपीचा किती भाग महत्त्वाच्या विभागांना वाटून दिलेला आहे याची माहिती मी माझ्या विभागाला विचारली असून त्या आधारावर भविष्यातील धोरणे ठरवीन, असे राणे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उल्लेख करून राणे म्हणाले की, तेथील धावपट्टी ही मूळ योजनेपेक्षा लहान झाली असून ती विस्तारित कशी करता येईल, हे मी बघेन.पर्यटनाला चालनासमुद्राच्या किनाऱ्यावर साचलेल्या बॅकवॉटरला ते जेटी म्हणून वापरतील. त्यामुळे लोक गोवा आणि रत्नागिरीला जाऊ शकतील व त्यातून पर्यटनाला, स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल आणि तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होतील, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vijay Dardaविजय दर्डा