शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंदावस्थेत, आरटीआयमधून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:38 IST

नवी दिल्ली- नोटाबंदी लागू केल्याच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर 2017ला एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीवरून विरोधकांनी भाजपा सरकारवर वारंवार टीका केली असताना केंद्र सरकारनंही कायम नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

नवी दिल्ली- नोटाबंदी लागू केल्याच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर 2017ला एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीवरून विरोधकांनी भाजपा सरकारवर वारंवार टीका केली असताना केंद्र सरकारनंही कायम नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकीतील भाजपाला मिळालेल्या विजयानंतर तर सत्ताधा-यांनी विरोधकांनाही चुकीचं सिद्ध केलं होतं. 2 हजारांच्या नव्या नोटांवरून विरोधकांनी भाजपा सरकारला वारंवार लक्ष्य केलं होतं. तसेच भाजपानंही त्याला वारंवार चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय चलनात 2 हजाराच्या नोटेचा समावेश झाल्यानंतर महिन्याभरातच रा.स्व. संघाचे विचारक एस. गुरूमूर्तींनी जाहीरपणे निवेदन केले की जे लोक 2 हजारांच्या नोटा साठवून ठेवू इच्छितात, त्यांनी आताच त्याचा पुन:र्विचार केलेला बरा, याचे कारण 2 हजारांची नोट अधिक काळ चलनात राहिल, याची अजिबात शक्यता नाही.एप्रिल महिन्यात राज्यसभेत सरकारने उत्तर दिले की २ हजाराच्या नोटेचे निश्चलनीकरण करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. पत्रकारांनी अर्थमंत्री अरूण जेटलींना आॅगस्ट महिन्यात विचारले की २ हजारांची नोट टप्प्या टप्प्याने चलनातून बाद करण्याचा सरकारचा इरादा आहे काय? त्यावर जेटलींनी नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले की, असा कोणताही विचार सरकारच्या मनात नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2000 रुपयांच्या नोटांची मर्यादित छपाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. लाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात त्या छापण्यात येणार नाहीत. 2 हजार रुपयांच्या नोटांवरून सरकारकडूनही वेळोवेळी स्पष्टीकरण दिलं जात आहे. तसेच 2 हजार रुपयांच्या नोटांच्या विमुद्रीकरणाची कोणतीही योजना नाही, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं. इंडिया टुडे नेटवर्कच्या वृत्तानुसार, आरटीआय कार्यकर्त्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे माहिती अधिकारांतर्गत 2 हजार रुपयांच्या छपाईसंदर्भात माहिती मागवली होती. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL)कडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी आरबीआयकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही फक्त 500 रुपयांच्या नोटा छापत आहोत, असंही SPMCILनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे SPMCIL 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करत नसल्याचं उघड झालं आहे. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक