शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांचे शब्द आणि कृती जुळत नाही'; राहुल गांधींचचा नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 16:45 IST

'राष्ट्रासाठी खादी आणि राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर'

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. आता मोदींनी खादीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राहुल यांनी रविवारी ट्विटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी खादी महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले होते की, 'स्वातंत्र्यानंतर खादीकडे दुर्लक्ष झाले होते, पण आता हेच खादी स्वावलंबी भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे. खादी जशी स्वातंत्र्याची प्रेरणा बनली, त्याचप्रमाणे ती स्वावलंबी भारतासाठीही मोठी प्रेरणा बनू शकते.'राहुल गांधींची टीकामोदींच्या खादीवरील वक्तव्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ नसतो. राष्ट्रासाठी खादी, पण राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर', असे ट्विट राहुल यांनी केले. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रध्वज खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. भाजप राष्ट्रवाद विकत असून गरिबांचा स्वाभिमान दुखावत असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.

पेगासस प्रकरणावरही टोमणापेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले होते की, 'पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या समितीला मदत न करणे, यातून स्पष्ट होते की त्यांच्याकडे काहीतरी लपविण्यासारखे आहे. हे सरकारला लोकशाही चिरडण्याचे काम करत आहे'. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी