शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पंतप्रधानांनी वाढदिवशी घेतले आईचे आशीर्वाद

By admin | Updated: September 18, 2016 05:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींयांनी आपला ६६ वा वाढदिवस शनिवारी गुजरातमध्येच साजरा केला.

अहमदाबाद/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपला ६६ वा वाढदिवस शनिवारी गुजरातमध्येच साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि विविध संवयंसेवी संघटनांनी गुजरातच नव्हे, तर देशभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी सकाळी गांधीनगरमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. आईची भेट घेण्यासाठी नरेंद्र मोदी ज्या कारमधून मोदी गेले, त्यात त्यांच्यासमवेत कोणीच नव्हते. मात्र ते आईला भेटायला येणार, हे माहीत असल्याने घरी पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांच्याबरोबरच भाजपाचे काही नेते व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. तरीही छायाचित्रांत आणि दृश्यांत आपण व आई यांच्याखेरीज कोणीही दिसणार नाही, याची काळजी पंतप्रधानांनी घेतली.मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला होता. प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत देशाचा गौरव ठरणाऱ्या सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरण्यात आला होता. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींच्या कामिगरीचा उल्लेखही त्यावर होता. सुरत येथे हा केक कापण्यात आला. स्वच्छ भारत अभियान आण िआणि मुलींना मोफत पुस्तके पुरविण्यासारख्या सामाजिक कार्यात भूमिका बजावणाऱ्या अतुल बेकरीने हा केक तयार करण्याचे केला. हा केक कापल्यानंतर दिव्यांग, कमकुवत आणि वंचित घटकांमधील मुलींना तो वाटण्यात आला. सकाळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लिमखेडा गावात वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक विकास योजनांचा आरंभ करण्यात आला. दुपारी त्यांच्या हस्ते नवसारीत ११ हजार २00 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचे वाटप करण्यात आले. तसेच २२00 जणांना श्रवणयंत्रे आणि १२00 जणांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. (वृत्तसंस्था/लोकमत न्यूज नेटवर्क)>हदपाडी आणि कोटवाडियासारख्या अतिमागास भागात काम करणाऱ्या शक्ती फाऊंडेशनने या अनोख्या केकची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, म्हणून प्रयत्न चालविले आहेत. देशभरातील एक हजाराहून अधिक गिटारवादकांनी सुरतमध्ये शांततेचा संदेश देणरी धून वाजवली. त्यांनी मोदींच्या जन्मिदनानिमित्र खास धून तयार केली होती.