शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५० लाख नवमतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद; भाजपची मतदार संमेलने, तरुणांची मते जाणून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 06:26 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी भाजप मुख्यालयात भाजप युवा मोर्चा कार्यक्रमात नवीन मतदार संमेलनाचे उद्घाटन केले.

- संजय शर्मा 

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जानेवारी रोजी ५० लाख नवीन मतदार आणि तरुणांशी ऑनलाइन संवाद साधतील. देशातील तरुण आणि नवीन मतदारांना भाजपशी जोडण्यासाठी देशभरात नवीन मतदार संमेलनाचे आयोजन करणार आहे.  

‘अब की बार ४०० पार’ या नव्या घोषणेसह भाजप निवडणूक लढविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक तरुणांवर जास्तीतजास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. २५ जानेवारी रोजी नरेंद्र मोदी देशातील ५० लाख नवीन मतदारांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. त्यानंतर देशभरात नवीन मतदार संमेलन आयोजित करणार आहे.

नेतेही राहणार उपस्थितभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी भाजप मुख्यालयात भाजप युवा मोर्चा कार्यक्रमात नवीन मतदार संमेलनाचे उद्घाटन केले.देशभरातील नवीन मतदार आणि तरुणांना भाजपशी जोडण्याचे निर्देश दिले. भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनाही या नवमतदार संमेलनांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

२९ रोजी पंतप्रधान करणार ‘परीक्षा पे चर्चा’ देशातील दोन कोटींहून अधिक तरुणांना भाजपशी जोडून मतांची टक्केवारी वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ जानेवारीला विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी आणि तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय सांभाळते. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या आजवरच्या संवाद कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात विद्यार्थ्यांनीही मोदी यांना मनमोकळेपणाने अनेक प्रश्न विचारले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा