नवी दिल्ली - मागील ५ दशकांपासून सरकारच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयाचं केंद्र राहिलेले साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांचे कार्यालय आता ब्रिटीश कालीन इमारतीतून नव्या सेवा तीर्थ येथे शिफ्ट होणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी शुक्रवारी साऊथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या कार्यालयात अखेरची कॅबिनेट बैठक घेतील. त्यानंतर नव्या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन करण्यात येईल. रायसीना हिलजवळ नवी प्रशस्त इमारत साऊथ ब्लॉकपासून काहीच अंतरावर आहे.
माहितीनुसार, शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान साऊथ ब्लॉकपासून सेवा तीर्थला जातील. जिथे पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे कार्यालय आणि इंडिया हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा पाहुणचार करण्यासाठी बनवलेले नवीन ठिकाण आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट बैठक साऊथ ब्लॉकमध्येच झाली होती. रायसीना हिल येथे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकचं बांधकाम १९३१ साली झाले होते.
पंतप्रधान कार्यालयाचा इतिहास १९४७ साली बनलेल्या एका छोट्या पंतप्रधान सचिवालयापासून सुरू होते. १९६४ साली याठिकाणी मोठे बदल झाले तेव्हा लाल बहादुर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांच्या कार्यालयाचा अधिकार क्षेत्र वाढले. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या काळात याचे पीएमओ नामकरण करण्यात आले. संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयही पुढील काही आठवड्यात साऊथ ब्लॉकमधून निघून वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये स्थलांतरित होईल. सेवा तीर्थ हे केवळ पंतप्रधान कार्यालयाचा नवा पत्ता नाही तर हा एक परिसर आहे जिथे सरकारमधील सर्वोच्च केंद्रांना एकत्र आणतो.
सेवा तीर्थ एकमध्ये पंतप्रधान कार्यालय, सेवा तीर्थ २ मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवा तीर्थ ३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचेही कार्यालय आहे. त्यात भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जाणारे अजित डोवाल बसून देशाच्या सुरक्षेबाबत रणनीती आखतील. जुन्या व्यवस्थेत या सगळ्या संस्था वेगवेगळ्या स्थानी कार्यरत होत्या ज्यातून संवेदनशील प्रकरणात समतोल साधणे आव्हानात्मक होते. पंतप्रधान कार्यालयाकडून साऊथ ब्लॉक पूर्णपणे खाली करून ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला भारत संग्रहालयात बदलण्यात येईल. जवळपास १२०० कोटी खर्च करून सेवा तीर्थ उभारण्यात आले आहे.
Web Summary : The Prime Minister's Office is moving from South Block to Seva Teerth. The last cabinet meeting will be held in South Block before the shift to the new administrative building. This move brings key government offices together for better coordination.
Web Summary : प्रधानमंत्री कार्यालय साउथ ब्लॉक से सेवा तीर्थ स्थानांतरित हो रहा है। नई प्रशासनिक इमारत में जाने से पहले अंतिम कैबिनेट बैठक साउथ ब्लॉक में होगी। इस कदम से प्रमुख सरकारी कार्यालय बेहतर समन्वय के लिए एक साथ आएंगे।