शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:53 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा आणि  भारतावर लादलेलं अतिरिक्त टॅरिफ यामुळे सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. सभेतील वक्त्यांची सुधारित यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं ८०वं अधिवेशन हे ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान, उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पहिला वक्ता ब्राझील असेल, तर त्यानंतर अमेरिका आमसभेला संबोधित करणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ सप्टेंबर रोजी यूएनजीएच्या पोडियमवरून जगाला संबोधित करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प हे दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत.

भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २७ सप्टेंबर रोजी या अधिवेशनाला संबोधित करतील. यापूर्वी जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमसभेतील वक्त्यांच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव होतं. तसेच मोदी हे २६ सप्टेंबर रोजी आमसभेला संबोधित करणार होते. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्याने यात बदल करण्यात आला आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited Statesअमेरिका