शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवशी करणार जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 10:43 IST

 भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत.

ठळक मुद्दे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत. नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या सुचनेनुसार धरणाचे १७ जून रोजी बंद केलेले ३० दरवाजेही पंतप्रधान उघडतील.दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.

मुंबई, दि.१६-  भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत. नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या सुचनेनुसार धरणाचे १७ जून रोजी बंद केलेले ३० दरवाजेही पंतप्रधान उघडतील. दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले,' यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल'.

या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे. 

या प्रकल्पाची पायाभरणी १९६१ साली झाली होती. अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली धरणाचे काम थांबवण्याचे आदेश १९९६ साली देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले. भारतातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने उद्यापासून काम करण्यास सुरुवात करणार आहे. सर्व काम पूर्ण होण्यास ५६ वर्षे लागण्याते हे विरळ उदाहरण असावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी