शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

पंतप्रधान मोदींच्या 4 वर्षात 84 देशांना भेटी, 1484 कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 10:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. या 84 देशातील दौऱ्यासाठी मोदींवर आजपर्यंत तब्बल 1484 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. या 84 देशातील दौऱ्यासाठी मोदींवर आजपर्यंत तब्बल 1484 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चार्टर्ड विमान, विमानांची देखभाल आणि हॉटलाईन सुविधांसाठी हा खर्च करण्यात आला आहे. परराष्ट्र राज्यांचे राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी याबाबत राज्यसभेत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 15 जून 2014 रोजी पहिला विदेश दौरा केला. त्यामुळे 15 जून 2014 ते 10 जून 2018 या कालवधीत मोदींच्या विदेश दौऱ्यावर 1484 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये विमानांच्या देखभालीसाठी 1088.42 कोटी, चार्टर्ड विमानांच्या उड्डाणांसाठी 387.26 कोटी रुपये तर हॉटलाईन सुविधेसाठी एकूण 9.12 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. नरेंद्र मोदींनी मे 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आत्तापर्यंत मोदींनी 42 विदेश दौऱ्यांमध्ये 84 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये 2014-15 मध्ये 13 देशांचा दौरा केला. तर भुटानपासून आपल्या पहिल्या विदेश दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर, 2015-16 मध्ये मोदींनी सर्वाधिक 24 देशांना भेट दिली. सन 2016-17 मध्ये मोदींनी 18 देशांचा दौरा केला तर 2017-18 मध्ये 19 देशांचा दौरा केला. यंदाच्या वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत मोदींनी 10 देशांचा दौरा केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAir Indiaएअर इंडिया