शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी उचलणार भविष्यात 'हे' पाऊल; आजच्या भाषणात दिले संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 11:10 IST

आम्ही जीएसटीच्या माध्यमातून एक देश, एक टॅक्स स्वप्न साकार केलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक मुद्दा चर्चेत आणला आहे. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात एकीकरण प्रक्रिया निरंतर सुरु राहणं गरजेचे आहे. एनडीए सरकारच्या कार्यकाळात देश एकीकरण प्रक्रियेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं मोदींनी सांगितले. 

नरेंद्र मोदींनी भाषणात म्हणाले की, आम्ही जीएसटीच्या माध्यमातून एक देश, एक टॅक्स स्वप्न साकार केलं. त्याचप्रकारे मागील काही दिवसांत ऊर्जा क्षेत्रात वन नेशन वन ग्रीड काम यशस्वीरित्या सुरु झालं आहे. वन नेशन, वन मोबिलिटी कार्डची व्यवस्था आम्ही विकसित केली. आज देशात व्यापक रुपाने चर्चा सुरु आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक. ही चर्चा व्हायला हवी. लोकशाहीत याची चर्चा होणं गरजेचे आहे. 

मागील वर्षभरापूर्वी विधी आयोगाने लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत शिफारश केली होती. यामुळे लोकांचे पैसे वाचविण्यात मदत होईल. याबाबत एक मसूदा कायदे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत देशात एक देश एक निवडणूक घेणं शक्य नाही. केंद्र सरकार याबाबत विचार करत आहे. निती आयोगाने मागील वर्षी एक उपाय सुचविला आहे की, 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाचा वेळ, निवडणुकांवर होणारा खर्चाची बचत होईल. या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सरकारकडून एका समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितले की, एक भारत श्रेष्ठ भारत याचं स्वप्न साकार करण्यासाठी अशा काही नवीन योजना, नवे प्रयोग करायला हवेत. आपल्याला देशाला जोडण्यासाठी मजबूत करण्यासाठी नेहमी पाऊलं उचलायला हवी. ही प्रक्रिया नेहमी सुरु राहील असा विश्वास त्यांनी दिला. तसेच देशाच्या एकीकरणासाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी कठीण प्रसंगी कठोर निर्णयही घेतले जाऊ शकतात. राजकारणात अनेक निर्णय राजकीय स्वार्थ पाहून केले जातात. माझ्यासाठी देशाचं भविष्य सर्वोच्च आहे. राजकीय भविष्याने काही होत नाही असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतElectionनिवडणूकGSTजीएसटी