शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचीही अरेरावी, गैरवर्तन खपवून घेणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 05:50 IST

कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीची किंवा तिच्या पुत्राची अरेरावी, गैरवर्तन अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना दिला. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र व इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका महानगरपालिका अधिकाऱ्याला नुकतीच बॅटने मारहाण केली होती. त्याबद्दल आकाश यांचे नाव न घेता मोदींनी त्यांनाच हा इशारा दिला आहे.कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप संसदीय पक्षाच्या या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीयही हजर होते. मोदी म्हणाले की, अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे. आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाºयाला मारहाण करताच त्यांना इंदूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. आपण केलेली कृती योग्यच होती व त्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य आकाश विजयवर्गीय यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजपसंसदीय पक्षाच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीबद्दल संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी ६ जुलैला भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे प्रारंभ होईल, तर अमित शहा तेलंगणामध्ये व अन्य राज्यांतील भाजप नेते आपापल्या भागात या मोहिमेला सुरुवात करतील.पाच झाडे लावण्याचा ‘पंचवटी’ कार्यक्रमभाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले.चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत.लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी