शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:03 IST

pm narendra modi stopped speech seeing child raised in air by person jammuPM Modi Jammu:  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करताना मधेच थांबले. सरकार गरीब, शेतकरी, युवा शक्ती आणि नारी शक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असे मोदी म्हणत असतानाच त्यांची नजर समोरील गर्दीमधील एका पिवळे कपडे परिधान केलेल्या बाळावर पडली. या चिमुकलीला तिच्या पालकांनी वर उचलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले, 'त्या चिमुकलीला त्रास नका देऊ.'

पंतप्रधान मोदी म्हणाले, ती फार छोटी आहे. हाताने इशारा करत मोदी म्हणाले, जर ती येथे असती (व्यासपीठावर) तर मी तिला भरपूर आशीर्वाद दिले असते. मात्र या थंडीत त्या चिमुकलीला त्रास नका देऊ. पंतप्रधान काही वेळ स्मित करत होते. यानंतर लोक घोषणा देऊ लागले.

आर्टिकल 370 चे भाजपल कनेक्शन! -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वर येत असलेल्या चित्रपटासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, मी ऐकले आहे की, कदाचित याच आठवड्यात 370 वर एक चित्रपट येत आहे. हा चित्रपट कसा आहे, हे मला माहीत नाही. मात्र, चांगलेच आहे, लोकांना खरी माहिती मिळण्यात कामी येईल. आज मी हिम्मत करून लोकांना म्हणालो आहे की, पुढच्या निवडणुकीत भाजपला 370 तर एनडीए ला 400 पार करा. आता जम्मू-काश्मीर एका संतुलित विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा