शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले जम्मू काश्मीरला केंद्रशासित करण्याचे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:42 IST

आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले. 

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित घोषित करण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीजम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले. आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. काही काळापूर्वी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जम्मू काश्मीरसाठी आखलेल्या कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. प्रशासनामध्ये गतिशिलता आली आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. विशेषकरून रस्तेबांधणी, रेल्वेसारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे. यावेळी मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर, लडाखवासियांचे अभिनंदनही केले. तसेच रिक्त पोलिस, सरकारी पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत. तसेच सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी योजनांपासून लांब राहावे लागले होते. मात्र, आम्ही लवकरात लवकर याचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370