शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 12:42 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अखेर कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न अन् संकल्प साकार झाला. अयोध्येत राम मंदिर झाले.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली, संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात करण्यात केली. प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला. गणपती पूजन करून रामललाचे पूजन, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी यांंनी चांदीचा एक मुकूट श्रीरामचरणी अर्पण केला. प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली. राजस सुकुमार असेच रामललाचे स्वरुप भावले. रामललांना विविध प्रकारची फुले, हार, रत्नजडीत अलंकार अर्पण करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

दिग्गज, मान्यवरांची लाभली उपस्थिती

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. बागेश्वर बाबा यांच्यासह साधू-संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती. 

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान, नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापणा!

दरम्यान, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांनी सुरुवातील रामनामाची स्तुती करणारी गीते सादर केली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथMohan Bhagwatमोहन भागवत