शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात स्वीकारार्ह नेते, मॉर्निंग कंसल्ट सर्व्हेचा दावा

By बाळकृष्ण परब | Updated: January 1, 2021 16:19 IST

Narendra Modi News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे.

ठळक मुद्देमॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्वेनुसार सुमारे ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला सर्वेमध्ये सहभागी झालेल्या २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केलात्यामुळे मोदींची एकूण स्वीकृती रेटिंग ही ५५ टक्के राहिली

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्मच्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्वेनुसार सुमारे ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे मोदींची एकूण स्वीकृती रेटिंग ही ५५ टक्के राहिली.याच प्रकाराचे जर्मनीच्या लोकप्रिय चांसलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. याचा अर्थ त्यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. भारतातील सर्वेदरम्यान घेण्यात आलेल्या सॅम्पलचा आकार दोन हजार १२६ एवढा राहिला आणि यामध्ये त्रृटीची शक्यता २.२ टक्के राहिली आहे.२०२० मध्ये कोरोनाने समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन भाजपासाठी फायदेशीर ठरले. या संकटकाळात भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चालवलेल्या अभियानांमुळे भाजपाने २०२० मध्ये नव्या क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिराचे केलेले भूमिपूजन, तसेच विविध भाजपाशासित राज्यांमध्ये करण्यात येत असलेले लव्ह जिहाद विरोधी कायदे यामुळे भाजपाची हिंदू व्होट बँक मजबूत झाली आहे. मात्र सरलेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाजपासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय