नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मँक्रो यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान दिला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्कार प्रदान, UN मध्ये भारताचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 13:19 IST