शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची 'आयपीएल डिप्लोमसी'; नेपाळ दौऱ्यात जोरदार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 19:03 IST

क्रिकेटमुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होत असल्याचं मोदी म्हणाले

काठमांडू: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात क्रिकेट संदर्भ देत संवाद साधला.  त्यांनी काठमांडूमध्ये लोकांना संबोधित करताना क्रिकेटच्या माध्यमातून नातं जोडण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमुळे नेपाळ आणि भारत एकमेकांशी जोडले गेल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. दोन देशांमधील संबंध यापुढे आणखी मजबूत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी नेपाळमध्ये बॅटिंग केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यात क्रिकेटचा उल्लेख केला. 'आता आपण क्रिकेटच्या माध्यमातूनही जोडले गेलो आहोत. नेपाळचा मुलगा आयपीएलमध्ये खेळतो आहे,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी मोदींनी संदीप लामिचाने यांचा उल्लेख केला. संदीप लाचिमाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. जानेवारी महिन्यात आयपीएलसाठी लिलाव झाला होता. दिल्ली डेअरडेविल्सनं संदीपला संघात घेतलं होतं.  सतरा वर्षांच्या संदीप लामिचाने या फिरकीपटूनं दोन वर्षांपूर्वी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. संदीपच्या शानदार कामगिरीमुळे नेपाळनं आठवं स्थान मिळवलं होतं. दिल्ली डेअरडेविल्सच्या संघानं संदीपसाठी 20 लाख रुपयांची बोली लावली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळIPLआयपीएल