शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान, पंतप्रधान मोदींचा सायरा बानोंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:28 IST

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिलीपसाहब यांच्या निधनानंतर, ही देशाची सांस्कृतिक हानी असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.  

देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान, पंतप्रधान मोदींचा सायरा बानोंना फोन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्वसामान्य चाहतेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर, दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही दिलीपसाहब यांच्या निधनानंतर, ही देशाची सांस्कृतिक हानी असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.  

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. चाहत्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी सायरा बानो यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला.  सिनेसृष्टीचे लिजेंड म्हणून दिलीप कुमार नेहमीच आपल्या स्मरणात राहतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महानायक दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांना अतुलनीय प्रतिभावंताचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच पिढ्यानपिढ्या प्रेक्षक त्यांच्या अभिनयावर मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचे निधन देशातील सांस्कृतिक जगताचे मोठे नुकसान आहे, अशा शब्दात मोदींनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे. 

दिलीप कुमार यांना ३० जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर, जेव्हा त्यांना आराम वाटू लागला, तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले होते, मात्र, बुधवारी पहाटे त्यांचं निधन झाले. 

 

टॅग्स :Dilip Kumarदिलीप कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानbollywoodबॉलिवूड