शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'भारताचे जावई' ऋषी सुनक यांचं पंतप्रधान मोदींनी मिठी मारून केलं स्वागत; Video नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:09 IST

G-20 Summit साठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आपली पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह भारतात आले आहेत

Rishi Sunak in G-20 Summit - Pm Modi hug Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत मंडपम येथे G-20 मध्ये उपस्थित असलेले सर्व देशांचे प्रमुख आणि पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटीश पंतप्रधान आणि 'भारताचे जावई' ऋषी सुनक यांचे मनापासून स्वागत केले. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान शुक्रवारी दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या देखील आल्या. मोदी यांनी आज ऋषी सुनक यांना हस्तांदोलन करत त्यांना आज अभिवादन केले आणि मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षण चर्चा झाली.

'जय सियाराम'च्या जयघोषात सुनक यांचे विमानतळावर स्वागत

पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी 'जय सियाराम'च्या घोषणा देत विमानतळावर त्यांचे स्वागत केले. चौबे यांनी सुनक यांना सांगितले की ते धार्मिक महत्त्व असलेल्या बक्सर या प्राचीन शहराचे खासदार आहेत आणि ज्या ठिकाणी प्रभू राम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनी महर्षी विश्वामित्र यांची भेट घेतली होती असे मानले जाते आणि विश्वामित्र यांच्याकडून दीक्षा घेतली होती, असे मंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, मंत्री यांनी सुनक यांना रुद्राक्ष, भगवद्गीता आणि हनुमान चालीसा भेट दिली.

सुनक 'भारताचे जावई'

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान, सुनक यांनी अनेकदा आपल्या हिंदू मुळांचा उल्लेख केला आहे आणि त्यांना याचा अभिमान असल्याचे सांगितले आहे. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. ती नारायण मूर्ती यांची कन्या. या कारणास्तव सुनक यांना भारतीय जावई असेही म्हणतात. "मी कुठेतरी पाहिले आहे की मला भारताचा जावई म्हणतात. मला आशा आहे की ते प्रेमाने म्हटले जाते," असे सुनक यावर बोलताना म्हणाले.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदRishi Sunakऋषी सुनकNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल