शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आसामच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 08:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे

दिसपूर, दि. 1- पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. याआधी सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुरामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना मोदींनी 50 हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये असतील. आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील पुराची परिस्थिती लक्षात घेता मोदींकडून एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. याबैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमधील मदत कार्याची माहिती घेणार आहेत. या बैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. 

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावासामुळे तेथिल जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील नद्या धोकादायक पातळीजवळ पोहचल्या आहेत. या पुरात आत्तापर्यंत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील काही भागातही सतत मुसळधार पाऊन सुरू असून तेथिल जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. 

गुजरातच्या पुराची केली हवाई पाहणीदेशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. याचबरोबर, केंद्र सरकारकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.