शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही! चीनने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:39 IST

सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा.

ठळक मुद्देचीन-भारत सीमा प्रश्नावर आमची भूमिका स्पष्ट आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले. दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असून काही मुद्यांवर एकमत झाले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. त्यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे.  त्यामुळेच चीनने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या या दौ-याविषयी आपण भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवणार असल्याचे चीनने म्हटले आहे. 

चीन-भारत सीमा प्रश्नावर आमची भूमिका स्पष्ट आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने मान्यता दिलेली नाही. तिथल्या वादग्रस्त भागात भारतीय नेत्यांच्या दौ-याला आमचा विरोध कायम आहे असे शिनुहा वृत्तसंस्थेने गेंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असून काही मुद्यांवर एकमत झाले आहे असे गेंग यांनी सांगितले. सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा, कटिबद्धता दाखवा अशी विनंती चीनने केली आहे. 

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारतानेही सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौ-यावर चीन नेहमीच आक्षेप नोंदवला आहे. दलाई लामा यांनी मागच्यावर्षी अरुणाचलचा दौरा केला त्यावेळी चीन प्रचंड संतापला होता. रोज चीनकडून भारताला इशारे दिले जात होते. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे.                                        

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश