शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संसद भवनाचा पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी समारंभ डिसेंबरमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:13 IST

अद्याप अधिकृत घोषणा नाही; राजपथाचाही विकास होणार

नवी  दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

संसद परिसरात असलेले महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पाच महनीय व्यक्तींचे पुतळे नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले की, तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर हे पुतळे संसद संकुलात पुन्हा बसविण्यात येतील. सध्याच्या संसद भवनाशेजारीच नवे संसद भवन बांधण्यात येईल. हे काम सुरू झाल्यापासून २१ महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. संसद भवन व परिसराच्या विकास योजनेत राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटपर्यंत ३ कि.मी. लांबीच्या राजपथाचे रंगरूपही बदलण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ १० डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

तेव्हा ८३ लाख, आता ८६१ कोटी!नवीन संसद भवनाची बांधणी व परिसराच्या विकासाला ८६१.९० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्याच्या संसद भवनाचा आराखडा ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटन्स व हर्बर्ट बेकर यांनी तयार केला होता. या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ १२ फेब्रुवारी १९२१ साली झाला व इमारतीचे काम त्यानंतर सहा वर्षांनी पूर्ण झाले. त्यासाठी ८३ लाख रुपये खर्च आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद