शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत, काही लोकांच्या हाती रिमोट कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 5:39 AM

राहुल गांधी यांची टीका : सरकारला तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील

ठळक मुद्देराहुल गांधी म्हणाले की, मोदी म्हणत आहेत की, कोरोनामुळे देशाचे नुकसान झाले. मात्र, नुकसान तर कोरोनाच्या अगोदर झाले. वस्तुस्थिती ही आहे की, मोदी आणि त्यांचे दोन- तीन उद्योगपती मित्र आपल्याकडून सर्वकाही हिसकावून घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी हे देशातील शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत आणि वारंवार चर्चा करुन ते शेतकऱ्यांना थकवू पाहत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी यांना लक्ष्य केले. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पण, त्यांचा रिमोट कंट्रोल तीन- चार लोकांकडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी जंतर- मंतर येथे जाऊन पंजाबमधील त्या संसद सदस्यांप्रती एकजूटता प्रकट केली जे गत ४० दिवसांपासून कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. पंजाबशी संबंधित काँग्रेसचे लोकसभा सदस्य जसबीर गिल, गुरजीत औजला, रवनीत सिंह बिट्टू आणि अन्य नेते आंदोलन करतआहेत. 

राहुल गांधी म्हणाले की, मोदी म्हणत आहेत की, कोरोनामुळे देशाचे नुकसान झाले. मात्र, नुकसान तर कोरोनाच्या अगोदर झाले. वस्तुस्थिती ही आहे की, मोदी आणि त्यांचे दोन- तीन उद्योगपती मित्र आपल्याकडून सर्वकाही हिसकावून घेत आहेत. हेच उद्योगपती सर्वकाही चालवित आहेत. शेतकऱ्यांना हे लक्षात यायला हवे की, वेळकाढूपणा केला जात आहे आणि त्यांना थकविले जात आहे. एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, दोन काय अथवा शंभर काय मोदी यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना असे वाटते की, शेतकरी थकून जाईल आणि पळून जाईल. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे की, शेतकरी पळून जाणारा नाही. आपल्याला पळून जावे लागेल. 

आज शेतकरी, उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर n    राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे काही वेळ पक्षाच्या या संसद सदस्यांसोबत आंदोलनस्थळी बसले. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भूसंपादन कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही त्यांना रोखले. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांना संपविणारे कायदे आहेत. n    ज्या दिवशी खाद्य सुरक्षा समाप्त होईल त्यादिवशी स्वातंत्र्य संपुष्टात येईल. ते म्हणाले की, एकीकडे देश आहे आणि दुसरीकडे मोदी यांचे काही भांडवलदार मित्र. देशातील अनेक लोकांना ही बाब लक्षात आली नाही की, आज शेतकऱ्यांचा अधिकार हिसकावला तर उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर आहे. त्यानंतर दुसरे लोकही आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी