शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

पंतप्रधानांची लोकसभेच्या कामकाजाकडे पाठ; लोकसभेत केवळ एकच दिवस उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 06:20 IST

‘पीएम मोदी गैरहजर’ असा फलक दाखवत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा कामकाजाबद्दल गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी केवळ एकच दिवस लोकसभेतील कामकाजात सहभाग घेतला. यावरून विरोधकांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा कामकाजाबद्दल गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.

संसदीय कामकाजात जास्तीतजास्त सदस्यांनी अधिकाधिक काळ उपस्थित राहावे, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिले होते. परंतु स्वत: मोदी यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला नाही. हिवाळी अधिवेशनाची सुरुवात गेल्या २९ नोव्हेंबरला झाली होती. या दिवशी मोदी हजर होते. यानंतर एकही दिवस ते लोकसभेत आले नाही. पंतप्रधानांकडे असलेल्या खात्याची उत्तरे पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीच दिले. लोकसभेच्या एकूण १८ बैठका झाल्या. त्यापैकी केवळ पहिल्या दिवसाच्या बैठकीला ते हजर होते. त्यानंतर ते लोकसभेत आले नाही.शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी तसेच लखीमपूर खिरी प्रकरणात आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांचे वडील गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. यासंदर्भात पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. या मागणीकडेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिले नाही.

पीएम गैरहजरचे फलक

या मुद्यावरून विरोधकांनी पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी ‘पीएम मोदी गैरहजर’ असा मजकूर लिहिलेला फलक लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी करताना दाखविला होता.

१८ तासांचा गोंधळ

- लोकसभेच्या एकूण १८ बैठकीमध्ये ८३ तास १२ मिनिटे कामकाज झाले. त्यापैकी १८ तास ४८ मिनिटांचे कामकाज होऊ शकले नाही. 

- २ डिसेंबरला लोकसभेचे कामकाज रात्री १२.२० वाजेपर्यंत चालले. या अधिवेशनात एकूण ३६० तारांकित प्रश्नांपैकी ९१ प्रश्नांना मंत्र्यांनी तोंडी उत्तरे दिली तर, ४१४० प्रश्नांना लेखी उत्तरे देण्यात आली. 

- ९ डिसेंबरला सर्वाधिक ६२ सदस्यांनी शून्य प्रहरात मुद्दे उपस्थित केले. त्यापैकी २९ सदस्य या महिला सदस्य होत्या. 

- या अधिवेशनात एकूण १२ विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. त्यापैकी ९ विधेयकांना मंजुरी देण्यात आली. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाprime ministerपंतप्रधान