प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श : कदम
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
टाकळी हाजी : टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम आदर्श असून गोरगरीब जनतेला अहोरात्र सेवा या ठिकाणी मिळत असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सिद्धार्थ कदम यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श : कदम
टाकळी हाजी : टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम आदर्श असून गोरगरीब जनतेला अहोरात्र सेवा या ठिकाणी मिळत असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सिद्धार्थ कदम यांनी केले.कदम यांनी अचानक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. बी. गायकवाड, पुणे जिल्हा सेवक पतसंस्थेचे चेअरमन डॉ. संभाजी घोडे यांनी सभापती सिद्धार्थ कदम यांचे स्वागत केले.कदम यांनी परिसर तसेच आरोग्य केंद्राची पाहणी केली. या गावातील विकासकामांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आहे.कदम म्हणाले, की तालुक्याची शैक्षणिक प्रगती चांगली असून यापुढे निर्मलग्राम करण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेऊन काम केले जाईल.फोटोओळ : पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम यांची टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. सोबत डॉ. सी. बी. गायकवाड. (छाया : संजय बारहाते)०००००