शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:26 IST

संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश...

आजपासून देशात आर्थिक वर्ष २०२५-२६ ला सुरुवात झाली. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल्स प्रायसिंग अथॉरिटीने (NPPA) या सर्व ९०० हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत १.७४ टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. किंमत वाढलेल्या औषधांच्या यादीत गंभीर संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश आहे.

औषधांच्या किमतीतील वाढीसंदर्भात केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तर दिले. आपल्या लेखी उत्तरात त्या म्हणाल्या, “ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, 2013 (DPCO, 2013) च्या तरतुदींनुसार,  सर्व अनुसूचित औषधांच्या किमतीतहोलसेल प्राइस इंडेक्स (WPI) (ऑल कमोडिटीज) च्या आधारावर दरवर्षी संशोधन केले जाते. तसेच, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अनुसूचित औषधांच्या किमतीत WPI च्या वार्षिक बदलाच्या आधारे, १ एप्रिल, २०२४ रोजी ०.००५५१ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.”

त्या म्हणाल्या, “NPPA ने DPCO च्या परिच्छेद 2(1)(u) मधील व्याख्येनुसार, नवीन औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.

 या औषधांच्या किमती वाढल्या - - फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अ‍ॅझिथ्रोमायसिन या अँटीबायोटिकच्या २५० मिलीग्राम आणि ५०० मिलीग्रामची किंमत अनुक्रमे ११.८७ रुपये आणि २३.९८ रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे.

- अॅमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अॅसिड असलेल्या ड्राय सिरपची किंमत प्रति मिलीलीटर २.०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

- डायक्लोफेनॅकची (पेनकिलर) कमाल किंमत प्रति टॅब्लेट २.०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

- इब्रुप्रोफेन (पेनकिलर) - २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ०.७२ रुपये. तर  ४०० मिग्रॅ प्रति टॅबलेट १.२२ रुपये

- मधुमेहाच्या औषधांची किंमत (डॅपाग्लिफ्लोझिन + मेटफॉर्मिन + हायड्रोक्लोराइड + ग्लिमापीराइड) प्रति टॅब्लेट सुमारे १२.७४ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

- अ‍ॅसायक्लोव्हिर (अँटीव्हायरल) - २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ७.७४ रुपये,४०० मिग्रॅ: प्रति टॅबलेट १३.९० रुपये

- हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (अँटीमलेरियल) - २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ६.४७ रुपये, ४०० मिग्रॅ प्रति टॅब्लेट १४.०४ रुपये निश्चित करण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे, औषध उत्पादक केंद्र सरकारच्या कोणत्याही मंजुरीशिवाय WPI वर आधारित या औषधांच्या कमाल किरकोळ किमती वाढवू शकतात.

टॅग्स :medicinesऔषधंMedicalवैद्यकीयHeart Attackहृदयविकाराचा झटकाGovernmentसरकार