शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

‘सर्जिकल’चे पुरावे देण्यासाठी मोदी सरकारवर दबाव

By admin | Updated: October 4, 2016 03:49 IST

जिगरबाज भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाक प्रशिक्षित अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे व्हिडीओ, आॅडिओ फुटेज जारी करून पुरावे देण्यासाठी मोदी सरकारवर दबाव वाढत आहे

हरीश गुप्ता/शीलेश शर्मा,  नवी दिल्ली जिगरबाज भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाक प्रशिक्षित अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे व्हिडीओ, आॅडिओ फुटेज जारी करून पुरावे देण्यासाठी मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. या कारवाईचे पुरावे द्यावेत, अशी मागणी करणारांमध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपला आवाज मिसळला आहे. जवानांच्या धाडसाबद्दल केजरीवाल यांनी मोदींचे कौतुक केले असले, तरी राजकीय खेळी खेळत पाकिस्तानला उघडे पाडण्याची मागणी केली आहे. भारताने कारवाई केल्याच्या दिवसापासून पाकिस्तान अशा प्रकारची कारवाई झालीच नसल्याचे ठासून सांगत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सीमा टेहळणी गटानेही अशा प्रकारच्या कारवाईचा थेट पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या प्रकारचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारताकडे या कारवाईचे सर्व पुरावे आहेत. योग्य वेळी ते जाहीर करण्यात येतील, त्यासाठी थांबा आणि वाट पाहा, असेही ते म्हणाले. मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना, पक्षाच्या प्रवक्त्यांना, तसेच वरिष्ठ नेत्यांना ढोल वाजवीत आत्मप्रौढी मिरवू नका, असे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. तथापि, मोदी यांच्या निकटवर्तीयांनाही असे वाटते की, अधिक काळ दबावाला सामोरे जाणे कठीण होईल.काँग्रेस पक्षाचीही मागणीप्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारकडे वेळ नाजूक असल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करा, अशी मागणी केली. सर्जिकल आॅपरेशन हे पहिल्यांदाच झाले आहे, असे नाही. फरक एवढाच आहे की मनमोहन सिंग यांच्या सरकारने लष्कराला ते आॅपरेशन जाहीर करावे की नाही याचे अधिकार दिले होते, असे माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले. मोदी यांनी या आॅपरेशनला राजकारणाचे कपडे घालून सर्जिकल आॅपरेशन केले, हे जगाला सांगण्याचा स्वत: निर्णय घेतला, असे ते म्हणाले.