शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Presidential Election 2022: 18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, 21 जुलै रोजी भारताला मिळणार नवे राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:49 IST

Presidential Election 2022: भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.

Presidential Election 2022: अनेक दिवसांपासून ज्याची उत्सुकता लागली होती, त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून, 21 जुलै रोही देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद निवडणुकीची घोषणा केली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. 

'...तर मतदान रद्द होणार'मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई पेन देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी 1,2,3 अशा पर्यायांची निवड करावी लागेल. पहिली पसंती न दिल्यास, मतदान रद्द केले जाईल.' 

खासदाराच्या मतांचे मूल्य किती?'या काळात राजकीय पक्ष व्हीप जारी करू शकत नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होणार असून, राज्यसभेचे महासचिव हे निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत खासदाराच्या मतांचे मूल्य 700 असेल. यासोबतच तुरुंगात असलेले प्रतिनिधी मतदान करू शकतात, त्यांना पॅरोलसाठी अर्ज करावा. 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 4,809 मतदार मतदान करणार आहेत,' अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

संबंधित बातमी- कशी होते राष्ट्रपतींची निवडणूक? खासदार-आमदारांच्या मतांचे मूल्य काय? असे आहे गणित...

कोण मतदान करू शकतात?17 जुलै 2017 रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा जवळपास 50 टक्के मते एनडीएच्या बाजूने पडली होती. एकूण 4,880 मतदारांपैकी 4,109 आमदार आणि 771 खासदारांनी मतदान केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग नसतो. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यात मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांच्या किमतीचे गणित वेगळे असते. सर्व प्रथम, सर्व राज्यांच्या विधानसभाच्या आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग