शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 12:29 IST

शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले.

शिर्डी -  शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे.  आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे लोकार्पण केले. त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले.  यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजस्तंभावर विधिवत ध्वज फडकावून साई समाधी शताब्दीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर साईनगर मैदानावर झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रपतींनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमान वाहतूक मंत्री गजपती राजू, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे,  संस्थान अद्यक्ष सुरेश हावरे उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपतींचा साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थानच्यावतीने राष्ट्रपतींचा हावरे यांनी सत्कार केला.  "शिर्डीच्या भूमीत येऊन मी स्वतःला धन्य समजतो, गेल्या सत्तावीस वर्षांपासून येतो, आज माझ्यामुळे अनेक भाविकांना असुविधा , समाधी शताब्दी साठी आलो, इथे साईची कर्मभूमी पावन भूमी तिला वारंवार नमन करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.  या विमानतळामुळे भाविकांची सोय होईल, तसेच रोजगाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच साई बाबांचे जन्मस्थान अशी श्रद्धा असलेल्या पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याने विकसित केलेला हा देशातील पहिलाच विमानतळ असल्याचे सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विमानतळामुळे आपली स्वप्नपूर्ती झाल्याची भावना व्यक्त केली. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस