शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा, पद सोडावं लागणारे मोदी सरकारमधले पहिलेच मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:29 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर हा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वादग्रस्त परिस्थितीनंतर राजीनामा देणारे अकबर हे मोदी सरकारमधील पहिलेच मंत्री ठरले आहे.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्विकारला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकबर यांचा राजीनामा स्विकारला. त्यानंतर प्रकियेचा भाग म्हणून तो राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठिवण्यात आला होता. अकबर यांच्यावर अनेक पत्रकार महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे वादात सापडलेले एम.जे. अकबर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची खासदारकीही धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्यांनीच त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अकबर यांना भाजपानं मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं आहे. पुढील महिन्यात मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. अकबर यांच्यावरील आरोपांचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांनी अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधान