शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राष्ट्रपती म्हणतात, “मला ५ लाख पगार मिळतो, त्यातला पावणे ३ लाख टॅक्स जातो, माझ्यापेक्षा जास्त तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 22:41 IST

President Ramnath Kovind News: सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे

ठळक मुद्देजेव्हा मी खासदार होतो तेव्हा झीझक रेल्वे स्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत होत्या त्या कालांतराने बंद झाल्या. कोरोनामुळे कदाचित हे झालं असावं. येणाऱ्या काळात पुन्हा या रेल्वे स्टेशनवर सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल. मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलनुसार काही अंतर आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि समस्या मला सांगू शकता.

 कानपूर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कानपूर जिल्ह्यातील त्यांच्या परौंख गावी गेले. कानपूरच्या देहात जिल्ह्यातील झीझक रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ६.१० मिनिटांनी राष्ट्रपतींची स्पेशल ट्रेन पोहचली. मी आज इथं तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटलं.

रामनाथ कोविंद म्हणाले की, या रेल्वे स्टेशनबाबत प्रत्येक आठवण ताजी आहे. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा झीझक रेल्वे स्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत होत्या त्या कालांतराने बंद झाल्या. कोरोनामुळे कदाचित हे झालं असावं. येणाऱ्या काळात पुन्हा या रेल्वे स्टेशनवर सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल. मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलनुसार काही अंतर आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि समस्या मला सांगू शकता. देशात स्वातंत्र्यानंतर बराच विकास झाला आहे. या विकासात तुम्हीही योगदान दिले आहे असं राष्ट्रपती म्हणाले.

शिक्षकांना सर्वाधिक पगार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे. ज्यातील पावणे तीन लाख करात जातात. तर वाचले किती? आणि जितके वाचले त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना आणि अन्य लोकांना मिळतो. याठिकाणी काही शिक्षक बसलेत त्यांनाही सर्वाधिक पगार आहे.

असा असेल कार्यक्रम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कानपूरला पोहोचतील आणि दुसर्‍याच दिवशी आपल्या जुन्या ओळखीच्या लोकांना भेटतील. यानंतर हेलिकॉप्टरने राष्ट्रपती त्यांच्या मूळ गावी परौंख व कस्बा पुखराया येथे जातील. त्यांच्या सन्मानार्थ तेथे २७ जून रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथून ते २७ तारखेला कानपूरला परत येतील. रात्री येथे मुक्काम केल्यानंतर ते २८ जून रोजी सकाळी आपल्या विशेष ट्रेनने लखनऊला रवाना होतील. ते दोन दिवस लखनौमध्ये थांबतील आणि २९ जून रोजी संध्याकाळी हवाई दलाच्या विमानाने दिल्लीला पोहोचतील.

तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता. भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली ते देहरादून विशेष रेल्वेने प्रवास केला होता. कोविंद यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत ही अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे. ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता. डॉ. प्रसाद यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींनी देखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. आज रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीत राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद